पत्नी बाहेर जाताच मुलीवर अत्याचार

पत्नी बाहेर जाताच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची भयावह घटना संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली आहे. येथील एका सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
आरोपीची पत्नी गावाला गेल्यावर आरोपी पीडित मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. मागील वर्षभरापासून तो सातत्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.
अखेर पीडित मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. अंतोन शामसुंदर गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्या सावत्र बापाचं नाव आहे. तो मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील नागापूर येथील रहिवासी आहे. सध्या तो पैठण शहरातील संतनगर भागात दुसरी पत्नी अश्विनी आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत भाड्याच्या घरात राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आई अश्विनी तिच्या दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी अनेकदा अहिल्यानगरला जात असे. पत्नी गावी गेल्यानंतर आरोपी अंतोन सावत्र मुलीबरोबर अश्लील चाळे करायचा. मायलेकीला जीवे मारण्याची धमकी देत तो अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा. 21 फेब्रुवारीला रात्री साडे दहाला आरोपीनं पुन्हा एकदा पीडित मुलीकडे शरीर सुखाची मागणी केली.
पण घटनेची माहिती पीडितेनं आपल्या आईला दिली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात धाव घेत, फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अंतोन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.