२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा लवकरच

२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा  लवकरच


संभाजीनगर/ प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित  २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू होत आहे. दिनांक २० व  २१  जानेवारी २०२५ या दिवशी या स्पर्धा होतील. २० जानेवारी रोजी सकळी उदघाटन समारंभ पार पडणार व लगेचच  नाटकाचे प्रयोगांचे सादर होणार आहेत.  
         सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.  
        या स्पर्धेमध्ये एकूण १० संघांचा सहभाग आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील इतरही संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  
समन्वयक म्हणून  रूपेशकुमार परतवाघ ,  करण लुंगाडे जैन, अनिल मोरे हे कार्यरत आहेत .
बालनाट्य स्पर्धेचा  जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लाभ घ्यावा  आणि बाल कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा