प्रत्येकात बौद्धिक क्षमता पण ती कागदावर उतरत नाही- नीलेश गटणे

प्रत्येकात बौद्धिक क्षमता पण ती कागदावर उतरत नाही- नीलेश गटणे

औरंगाबाद/प्रतिनिधी : प्रत्येकात बौद्धीक क्षमता आहे. ती कागदावर उतरत नाही. वरिष्ठ स्तरावर धडपड होतांना ऊर्जेने काम करण्याची वृत्ती दिसत नाही. विभागाचे प्रमुख या नात्याने प्रत्येकात दिशा देण्याची ताकद असायला हवी. शासकीय कामकाज हे नीटनेटक आणि चौकटीत पार पाडावे अशी अपेक्षा असते. पत्र लिहितांना लांबलचक लिहितात. विषय एक किंवा दोन ओळींचा हवा. ते सांगायचे आहे प्रस्ताव सादर करायचे आहेत. ते अचुक आणि आक्षेप घ्यावा असे वाटणार नाही. अशा अचूक पद्धतीने लिहा, अशा सूचना जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी अधिकारी कर्मचारी यांचा कार्यशाळेत केल्या.

जिल्हा परिषदेच्या वतीने मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे गुरुवार (२४) रोजी सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ सहाय्यक यांचे एक दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सीईओ गटणे बोलत होते. यावेळी डॉॅ. नागेश अंकुश, सामान्य प्रशासनचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रशासक गटणे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून पाहतो आहे. संघटना अथवा कुणाचे निवेदन आले तर त्यांचे म्हणणे आणि माहिती देतांना तोच मजकुर कॉपी पेस्ट केला जातो. प्रत्येक शाखेतून जे प्रस्ताव येतात ते कुणीही पुन्हा पाहण्याची तसदी घेत नाही. खूप पाल्हाळ लिहिण्यापेक्षा आपल्याला काय सांगायचे आहे. ते थोडक्यात कमी शब्दात प्रस्ताव सादर करायला हवेत. जे वरिष्ठांना सांगायचे आहे ते नेमक्या शब्दात असावे अशा शब्दात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. अंकुश यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, क्षमता म्हणजे सामर्थ्य लिहितो आणि बोलतो ती भाषेबद्दलची क्षमता आहे. जे लिहितो ते वाचनीय असलं पाहिजे. जे व्यवहार करतो ती औपचारिक भाषा असते. बोलीभाषा ही चांगली आहे. परंतु लिहितांना तसं औपचारिक चालत नाही. क्षमता बांधणीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते. असे अंकुश म्हणाले. या बरोबरच लिहितांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी देखील त्यांनी माहिती दिली.

प्रशिक्षण दरम्यान मराठी शुद्धलेखन या विषयावर सरस्वती भूवन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नागेश अंकुश यांनी माहिती दिली तर माहितीचा अधिकार २००५ या विषयावर जलसंधारण विभागाचे सहाय्यक अधीक्षक जालिंदर तांबे यांनी माहिती दिली. विभागीय चौकशी प्रक्रिया या विषयावर सुनील कौसडीकर यांनी, लेखाविषयक प्रक्रिया या विषयावर बी जी कुलकर्णी व वैद्यकीय परिपूर्ती या विषयाबाबत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रशासन अधिकारी ए एन फारोकी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी लक्ष्मीकांत बोरसे, रामदास उत्तरवार, सुरेश देवकर, बालाजी रामशेटवार, गोविंद इंगोले, महेश सराफ, मनोज देशपांडे, कल्याण ढोरकुले, सुभाष घुगे, दत्तात्रय हिंगे, रवींद्र जाधव, प्रशांत अभंग, योगेश चव्हाण, कमल मगरे,जमीला तडवी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वाघ यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत बोरसे यांनी व्यक्त केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा