पाणी हेच जीवन : डॉ. योगिता तौर होके

पाणी हेच जीवन : डॉ. योगिता तौर होके

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी  -  पाणी हेच जीवन आहे असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता तौर - होके यांनी केले.   भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व ग्रामविकास संस्था संयुक्त विद्यमाने ग्रामविकास भवन येथे महिलांसाठी आयोजित पाणी गुणवत्ता विषयक माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात औपचारिक उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.      

याप्रसंगी प्रमुख अतिथी  तृप्ती पालोदकर, संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे, जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक अलका पवार जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर, नमिता बोवशेट्टी सनियंत्रण व मूल्यांकन सल्लागार जल जीवन मिशन , बालाजी बिरादार यांची उपस्थिती होती. 
याप्रसंगी तृप्ती पालोदकर यांनी मनोगत व्यक्त केले.            पाणी गुणवत्ता व संबंधित विषयावर मास्टर ट्रेनर राजकुमार बिराजदार, शिवाजीराव घुगे, प्रशिक्षण समन्वयक अर्चना पवार यांनी मार्गदर्शन केले. 
  प्रशिक्षण कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह  पाचोड व परिसरातील 30 गावाच्या 60 महिला उपस्थित होत्या. समारोप प्रसंगी ग्रामविकास संस्थेच्या अध्यक्षा जयश्री हदगल यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र व मकर संक्रांतीनिमित्त भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवृत्ती घोडके, प्रकाश राठोड, दिपाली राऊत, प्रणिता साळवे  यांनी परिश्रम घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा