महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद आणि प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या वतीने विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
बदनापूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना विनासायास सर्वधर्मिय जात प्रमाणपत्र काढून त्याला लॅमेनेशन करून वाटप करण्याचा स्त्युत्य उपक्रम महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत मिळालेली प्रमाणपत्रे डिजिटल सावाक्षरीने मिळालेली असून ते सांभाळून त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनी केले. ते महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ मार्फत जात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमात एकूण 931 जात प्रमाणपत्रे काढून देण्यात आली त्याचे प्रतिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
बदनापूर येथील पोलिस ठाण्याजवळ झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पार्श्वभूमीचे संपादक दिलीप राठी, तहसीलदार रमेश मुंडलोड, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन इलियास खान, जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, दैनिक आनंद नगरीचे संपादक रविंद्र बांगड, भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक प्रितम शिंगाडे, सी.ए. गोविंद मुंदडा, मौलाना नदीम मुफ्ती, सरचिटणीस महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफिक अली, साप्ता. एकांतचे संपादक सय्यद रफिक अजीज, महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण, उनगराध्यक्ष शेख समीर, राजेंद्र कुमार तापडिया, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, जगन्नाथ बारगाजे, माजी उपनगराध्यक्ष शेख युनुस आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना राजगुरू यांनी अकरमखान पठाण राबवत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून असे स्त्युत्य उपक्रम राबवल्याबददल अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अक्रमखन यांनी पठाण यांनी सांगितले की, बदनापूर तालुक्यासह विविध ठिकाणच्या ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रने पुढाकार घेऊन संचिका जमा करून सर्व धर्मिय 931 जात प्रमाणपत्र बनवून घेतले. सामान्य नागरिकांना घरपोच जात प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम मुस्लिम तेली परिषदेमार्फत राबवण्यास आम्ही सुरुवात केली या आधी झालेल्या शिबिरात जवळपास 350 जातप्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलेले होते. त्या अनुभवातून या वेळी आम्ही 931 प्रमाणपत्रे विनामुल्य काढून दिली असून पुढेही सामाजिक कार्यात आम्ही वेळोवेळी सहभाग नोंदवू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. यशवंत हाके यांनी मानले.