मध्यवर्ती बसस्थानकात शेतकऱ्याची आत्महत्या

संभाजीनगर /प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवार दि. २० मार्च रोजी शेतीसाठी कर्ज घेतलेल्या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्यामुळे विष प्राशन करीत आत्महत्या केली.
स्वप्नील विक्रमसिंग पवार (वय ३३, रा. अनाडा, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानाकाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी तपासून मृत घोषित केले.
स्वप्नील यांच्यावर शेतीचे १५ लाखांचे कर्ज झाल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यांनी गुरुवारी सायंकाळी घरी मी शहरात कामासाठी चाललो असल्याचे सांगितले.
या आंदोलनात, आडगाव बुद्रुकसह भालगाव, परदरी, परदरी तांडा, टोणगाव, मुरूमखेडा आदी गावांतील शेतकरी सहभागी झाले. या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्याला खरीप २०२४ चा पीकविमा मिळाला नाही.
यासंदर्भात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषी विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्यानुसार त्यावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत तर २१ मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदंग वाजवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावरही कारवाई न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठून टाळ-मृदंग वाजवून आंदोलन केले.
या वेळी कृषी उपसंचालक दीपक गवळी यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी शासनाचा विमा परताव्यातील वाटा न मिळाल्याने विमा परताव्यात अडचणी येत असल्याची माहिती दिली.
कृषी उपसंचालक श्री. गवळी यांनी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळावा यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. ३१ मार्चपर्यंत विमा परतावा खात्यावर देण्याविषयी या वेळी आश्वस्त करण्यात आले. परतावा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी जगदीश डवले यांनी दिला.