गरीब मुलीच्या विवाहासाठी १२ हजार रुपयाची मदत

गरीब मुलीच्या विवाहासाठी १२ हजार रुपयाची मदत


औरंगाबाद/प्रतिनिधी- अन्न वाचवा समितीतर्फे गरीब पुजाऱ्याच्या मुलीच्या विवाह साठी बारा हजार रुपयांचा किराणा घेऊन जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी पुजारी यांनी अन्न वाचवा समितीचे आभार मानले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुजारी यांची नोकरी गेली त्यामुळे त्यांना मंदिरांमध्ये 2500 रुपयात काम करावे लागले अशातच त्यांच्या मुलीचा विवाह ठरला पण घरची परिस्थिती हातावरची असल्याने त्या भागातील अन्न वाचवा समितीच्या पांडे ताई यांना समजले त्यांनी तत्काळ अन्नवाचवा समितीच्या इतर सदस्यांना सांगितले व त्यांनी स्वतः पैसे जमा करून या गरीब पुजाऱ्याच्या मुलीचा विवाहाला मदत केली त्यांनी पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब यांना बोलावून सर्वांनी मिळून किराणा सामान पुजारी यांच्या सुपूर्द केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा