जगातील पहिला अभूतपूर्व पुस्तक प्रकाशन सोहळा
औरंगाबाद/प्रतिनिधी
शाहिर ह.भ.प जालिंदर महाराज केरे लिखित
गंगा प्रबोधनाची व व्यथा माझ्या बळीराज्याची या दोन सामाजिक विषयावरील पुस्तकाचे अनाथ बालिकांच्या हस्ते प्रकाशन करत एक अनोखा विचार आणि त्यामुळेच प्रकाशन सोहळा अनाथ आश्रमात आणि बालकांच्या हस्ते करण्यात आला. लोक मोठ्या हॉटेल मध्ये ठेवतात पण वैचारिक क्रांती करणारे केरे महाराज आणि आम्ही मित्र परिवाराने ठरवले आणि नवा आदर्श घालून दिला आहे इतिहासात नोंद घ्यावी असे कार्य केले.
भारूडरत्न,समाजप्रबोधनकार, शाहिर, अभिनेते , ह.भ.प जालिंदर महाराज केरे यांनी समाज प्रबोधन पर लिहीलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन भगवानबाबा बालिका अनाथ आश्रम पुरुषोत्तम नगर बीड बायपास औरंगाबाद येथे पार पडला . या सोहळ्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध उद्योजक चित्रपट निमार्ते मनोज कदम,उद्योजक अमृत मराठे,अनिल कुमार साळवे, गहीनीनाथ वलेकर या मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितित अनाथ बालिका यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक मनोज कदम यांनी सांगितले की, स्वत: ही पुस्तके खरेदी करावे आणि पुस्तक खरेदी करून वाचनालय आणि इतरांना भेट देऊन या पुस्तकाला त्याचा सन्मान मिळवून द्यावा कारण यामध्ये जालिंदर महाराज यांचे मोठे कष्ट आहे तसेच हा विषय समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे़ त्यामुळे प्रत्येकाने या पुस्तकाला सन्मान मिळवून द्यावा असे आवाहन मनोज कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बड़ोगे यांनी केले.