पोलिसांनी परवानगी नाकारली तरिही 50 हजारांच्या संख्येने मोर्चा काढणार - भाजप

औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नांवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३मे रोजी मानपावर आक्रोश  मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्च्याला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.मात्र अद्याप पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे भाजप पदाधिकारी चांगलेच  संतप्त झाले आहे.पोलीस राज्याच्या आघाडी सरकारच्या बाजूने काम करीत असल्याचा संशय येतो अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली.

२३ मे रोजी पाणी प्रश्नावरून भाजप पैठण गेट ते मनपा कार्यालय असा मोर्चा काढणार आहे. याच अनुषंगाने आज संध्याकाळी पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी मोजक्या अधिकाऱ्यांसह या मार्गाची पाहणी केली.या वेळी भाजपचे आमदार अतुल सावे, शहर अध्यक्ष संजय केनेकर सह इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पाहणी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिसांनी अजून परवानगी दिली नसल्याचे स्पष्ठ केले.तर पोलीस राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने काम करीत असल्याचा आता संशय येत आहे.असा आरोप करीत पोलिसांनी परवानगी नाकारली तरी येत्या २३ मे रोजी ५० हजारांचा आक्रोश मोर्चा मनपाच्या प्रवेशद्वारावर धडकणारच असा विश्वास शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी व्यक्त केला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा