पॉलीटेक्नीकच्या उज्वल निकालाची एमआयटीतील परंपरा कायम

पॉलीटेक्नीकच्या उज्वल निकालाची एमआयटीतील परंपरा कायम

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी- २०२४ च्या परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 
या निकालामध्ये एमआयटी पॉलीटेक्नीच्या विध्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा याही परिक्षेत कायम राखली आहे.
अंतिम वर्ष संगणक अभियांत्रीकीचा  गौरव काकडे ९१.६६% गुण घेऊन प्रथम आला आहे.  श्रीनिधी मोकाशी ( ९१. २०%) अजिंक्य धोत्रे ( ९०. ११%) अनुक्रमे द्वितीय आणि तृतिय आले आहेत. संगणक अभियांत्रिकीच्या अंतीम सेमिस्टरमधे  १० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षाची माधवी दायमा ही विद्यार्थिनी ८९. ३८% टक्के गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. 
अर्णव रत्नपारखी - ८७. ६५% द्वितीय  तर भक्ती भुमरे - ८७. २९%  ही गुणांसहीत तृतिय आली आहे. सिव्हील इंजिनिअरिंग विभागात प्रथम येण्याचा मान आचल आठवले ( ८९.१६%) हिने मिळवला. साक्षी पवार ( ८३. ३२% ) व गणेश सुरवसे (८२. ५३%) हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतिय आले आहेत. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागामधे ८८. ५% गुण घेऊन जितेश चौधरी  पहिला, अविनाश बगाटे ( ८७. ७८%) दुसरा आणि तेजस राजे ( ८६.४४%) तिसरा आला आहे. आर्टिफिशियल इंटेलीजन्स अँड मशीन लर्निंग या नविन अभ्यासक्रमाच्या पाहिल्या  बॅच मध्ये अनुश्री काळे ८६. ६७% गुण घेऊन प्रथम, ऋषिकेश खंडागळे ( ८५. ८९ % ) द्वितीय तर पराग कुलकर्णी ( ८५.२३%) तृतीय आले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींग मधून साहिल चौधरी  ह्या विध्यार्थ्यांने ( ८३.३८%) गुणांसहीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. आनंद जैस्वाल ( ८३.३३%) द्वितीय आणि ओम राठोड ( ८०.२२%) तृतीय आले आहेत.
महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सूद्धा भरघोस यश मिळविले आहे. द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी तनेश  आधाने याने ८९.८७ % गुण घेत पहिला क्रमांक मिळविला आहे.  त्याच वर्गाची गौरी साखळे ८९.२० % गुण घेत द्वितीय कमांकाची मानकरी ठरली आहे. द्वितीय वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमामध्ये कनक परदेशी ही विद्यार्थीनी ( ८५.०७%) घेऊन प्रथम आली आहे , तपन गुप्ता ( ८५.३०%) हा द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधे पहिला आला आहे. काजल राजपूत ( ८३. ३५%), जसमितमिंग चंडोक (८०.३२%) आणि प्रांजल माहेर ( ८८. ५४%) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल, मेकनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मधे प्रथम आले आहेत.
प्रथम वर्षामधून मैथिली कुलकर्णी - संगणक अभियांत्रिकी, तेजस खरात - आर्टिफिशियल ईटंलीजन्स  अँड मशीन लर्निंग , अनुजा शिसोदे - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, वरद कणसे - मेकॅनिकल अभियांत्रिकी, यामिनी कर्डिले- इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर अभियांत्रिकी तर कार्तिक बकले - सिव्हील अभियांत्रिकी मधून प्रथम आले आहेत. 
महाविद्यालयातील सर्वच अभ्यासक्रमाच्या तिनही वर्षाचे निकाल सर्वोत्कृष्ठ लागले आहेत. अंतिम वर्षाचे सर्व शाखांचे निकाल सरासरी ९०% लागले आहेत. विद्यार्थ्यांनी एमआयटीच्या उत्तम निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राखली आहे. 
सर्व गुणवंत आणि यशस्वी ‌विद्यार्थ्यांचे अभिनंदन एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनिश शर्मा, संचालक प्रा. बी. ए‌म. देशमुख, प्राचार्य प्रा. सुनिल देशमुख , सर्व विभागप्रमुख , ऑफिसर इनचार्ज आणि प्राध्यापक वृंदाने केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा