तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले प्रत्यक्षदर्शींनी दिला जबाब

तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले  प्रत्यक्षदर्शींनी दिला जबाब

गंगापूर /प्रतिनिधी - गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ गावात एका २५ वर्षीय तरुणाची रस्त्याच्या कडेला अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण रतन प्रधान यांनी दिलेल्या पोलिस जबाबानुसार, त्यांचा भाऊ अर्जुन प्रधान यास दिनांक 11 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास गावातील काही इसमांनी गंभीर मारहाण करून ठार मारले.


करण प्रधान यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे, अर्जुन याला त्याच्या सावत्र काकाच्या उसन्या रकमेच्या मागणीवरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. अर्जुन याने फोनवरून करण यांना माहिती दिली होती की, त्याला पांडू प्रधान आणि त्याचे साथीदार मारहाण करत आहेत. त्यानंतर अर्जुनचा फोन बंद झाला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी करण प्रधान गावात पोहोचले असता चैतन्य बल्हाळ यांच्या दुकानासमोरील रोडवर अर्जुन प्रधान याचा अर्धनग्न व रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी लाकडी काठ्या, लिंबाच्या झाडाच्या ओल्या फांद्या, नारळाच्या झाडाची फांदी, वायर व बेल्टचे तुकडे सापडले. हे पाहून त्यास अमानुषपणे मारहाण करून ठार मारल्याचे स्पष्ट झाले.
स्थानिक देविदास प्रधान, रुषीकेश उगले, संदीप प्रधान व मल्हारी दुधाट या साक्षीदारांनी ही संपूर्ण घटना पाहिल्याचे सांगितले असून त्यांनी भीतीपोटी आधी माहिती दिली नव्हती. त्यांच्या माहितीनुसार, अर्जुनला मारहाण करणाऱ्यांमध्ये पांडुरंग वामन प्रधान, अंकुश दिलीप प्रधान, अनिकेत संजय काकडे, अजय अशोक प्रधान, नंदकुमार बोहाडे, विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान यांचा समावेश आहे.
या घटनेमुळे अंबेलोहळ गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण प्रधान यांनी आपल्या जबाबात केली आहे.निलेश मच्छिंद्र प्रधान, विठ्ठल नामदेव प्रधान, पांडुरंग वामन प्रधान ,अंकुश दिलीप प्रधान, नंदकुमार दादासाहेब बोराडे
हे पाच आरोपी अटकत आहे

पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस आमदार बाळासाहेब आंधळे, राजेभाऊ कोल्हे, धीरज काबलीये, योगेश शेळके,  विक्रम वाघ, नितीन इनामे, वैभव गायकवाड, लखन घुशिंगे, समाधान पाटील,  हनुमंत ठोके, संतोष बबनवत, गजानन सोनूने, संदीप तागड आदींच्या पथकाने कारवाई केली.

मयतावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे आणि वाळूज पोलीस ठाण्यात चोरी, मारहाण अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा