भव्य फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन औरंगाबादच्या नागरिकांसाठी सुवर्णसंधी
औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद स्मार्ट सिटीने 21 ते 23 जुन या कालावधीत भव्य फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्मार्ट शहरातील स्मार्ट नागरिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे करण्यात येत आहे.
25 जुन 2022 ला केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनला 7 वर्ष पुर्ण होत आहेत. या निमित्ताने स्मार्ट सिटी मिशन तर्फे सबका भारत निखरता भारत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, नागरिक, विद्यार्थी यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना भेटी असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच निमित्ताने स्मार्ट सिटीने नागरिकांसाठी भव्य फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत स्मार्ट सिटीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे जसे की, माझी स्मार्ट बस, स्मार्ट सिटी बस थांबे, लव्ह सिटी ऑफ गेट्स एल ई डी बोर्ड्स, मनपा वॉर्ड कार्यालय अंतर्गत स्मार्ट सिटी चे नागरिक सुविधा केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल स्क्रीनस्, स्मार्ट सिग्नल्स, हेरिटेज गेट्स, शहागंज क्लॉक टॉवर, क्रांती चौक स्ट्रीट ट्रान्स्फॉर्मेशन, सायकल ट्रॅक सह पादचारी मार्ग ( प्रोझोन ते कलाग्राम, प्रियदर्शनी) इत्यादी उपक्रमांचे आकर्षक, लक्षवेधी आणि उत्तम फोटो औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या hq@aurangabadsmartcity.in या ईमेल वरती जमा करावेत. 21 ते 25 जुन या कालावधीत हे फोटो जमा करावेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरीकांना औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येत आहे.