बनावट नोटा छापणा-या टोळीच्या मुसक्या आवळल्या
औरंगाबाद /प्रतिनिधी - पुंडलिक नगर पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली की,काही ईसम हे पुंडलीकनगर रोडवरील सुपर वाईन शॉप या दुकाणात बनावट नोटा देऊन दारु खरेदी करत आहेत. माहिती मिळताच स.पो.नि.खटाने यांनी त्यांच्या पथकासह सापळा लावुन दि.28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीस ताब्यात घेतले.
आरोपीची विचारपुस केली असता यापुर्वी पोस्टे पुंडलीकनगर भागात गुन्ह्यातील व सध्या जामीणावर सुटलेला आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी यांच्या मदतीने मुकुंदवाडी येथे किरायाने रुम घेवुन त्याठिकाणी बनावट नोटा तयार करुन त्या नोटा अक्षय अन्नासाहेब पडुळ व दादाराव पोपटराव गावडे यांच्या मार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करत आहे अशी माहिती दिली. माहिती मिळताच स.पो.नि.खटाने व त्यांच्या पथकाने दिनांक 28 डिसेंबर रोजी छापा मारुन आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख (वय 30, रा.जसवंतपुरा नेहरु नगर औरंगाबाद, नितीन कल्याणराव चौधरी(वय 25 वर्षे रा.मुकुंवदवाडी गाव औरंगाबाद),अक्षय आण्णासाहेब पडुळ (वय 28 वर्षे नगर ग.न.01 औरंगाबाद), दादाराव पोपटराव गावंडे (वय 42 वर्षे रा. गजानन नगर ग.न.01औरंगाबाद), रघुनाथ चैनदास ढवळपुरे (वय 49 वर्षे धंदा मिस्त्री रा.गजानन नगर औरंगाबाद) यांना पकडले त्यांच्या ताब्यातुन 500,100,50 रुपये दराच्या बनावट सुमारे 1 लाख 20 हजार रुपयाच्या चलणी नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य कॉमप्युटर,ऑल ईन वन प्रिंटर, कटर स्केल, कागद असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच तयार केलेल्या बनावट नोटा वाहतुक करण्यासाठी वापरलेले वाहण महींद्रा लोगन कार व संपर्कासाठी वापरत असलेले पाच मोबाईल फोन असा एकुण 3,10,390/- रुपयाचा ऐवज जप्त करुन पोलीस अंमलदार गणेश डोईफोड याच्या फिर्याद वरुन पोस्ट पुंडलीकनगर गु.र.नं.509/2021 कलम 120(ब), 489(अ),489(ब), 489(क), 489(E), 420 भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना गुन्ह्यात अटक केली आहे.
आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील उच्च शिक्षीत सराईत गुन्हेगार असुन तो चलणामध्ये असणा-या ख-या नोटा स्टॅण्डर्ड कागदावर प्रिंटरद्वारे स्कॅन करुन त्याची प्रिंट काढुन कटर व स्केलच्या सहाय्यने हुबेहुब दिसणारी बनावट नोट तयार करण्यात पटाईत आहेत.यावेळीसुध्दा त्याने गुन्हा करतांना नवीन साथीदार त्यांना प्रशिक्षण देवुन तयार केले आहे अशी हकीकत आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता सर, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-2 दिपक गि-हे. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (उस्माणपुरा विभाग) विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप गांगुर्डे पोलीस निरीक्षक पोस्टे पुंडलीकनगर स.पो.नि. शेषराव खटाने सफौ.रमेश सांगळे,बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर,जालीदर मान्टे ,संतोष पारधे,दिपक जाधव, राजेश यदमळ,कल्याण निकम ,प्रविण मुळे ,रंज्जुसींग सुलाने अजय कांबळे ,म पो.शि.कोमल तारे ,चालक प्रशांत भगरे यांनी केली आहे.