ड्रायव्हर आणि प्रवाशांनी वाचवले एकमेकांचे प्राण

ड्रायव्हरच्या हातात प्रवाशांचा जीव असतो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु ड्रायव्हर आणि प्रवासी या दोघांनीही एकमेकांचे प्राण वाचवल्याची अद्भुत घटना नुकतंच घडली आहे. मुख्य म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
गढवा ते रांची जाणाऱ्या बसच्या ड्रायव्हरला अचानक हार्ट अटॅक आला. त्यावेळी बस एका नदीच्या पुलावर आली.ड्रायव्हरनं कशी तरी बस थांबवली आणि तो बेशुद्ध झाला. त्यावेळी काही प्रवाशांनी ड्रायव्हरला CPR दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वजण कौतुक करत आहेत.

नेमकं काय घडलं?
या प्रकणात मिळालेल्या माहितीनुसार गढवा सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुलावरुन एक बस वेगानं जात होती. त्याचवेळी ड्रायव्हर अस्वस्थ वाटायला लागलं. त्यानं एका बाजूला बस थांबवली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर बसमधील एका प्रवाशानं तातडीनं डॉक्टरला फोन लावला. त्यानं अन्य प्रवाशांच्या मदतीनं ड्रायव्हरला सीपीआर दिला. या घटनेचा 22 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ड्रायव्हरची छाती दाबत आहे. तर दुसरा त्याच्या तोंडावर पाणी टाकतोय. अन्य एका व्यक्ती त्याच्या हाताची मालिश करतोय. तर एक प्रवासी मा भगवती आणि नारायण जप करतानाही ऐकू येतोय.
सीपीआर देणाऱ्या राजीव भारद्वाज या तरुणानं सांगितलं की आम्ही गढवापासून जवळपास 13 किलोमीटर दूर होतो. त्यावेळी पुलावर अचानक बस अनियंत्रित होऊ लागली. ड्रायव्हरनं कसा तरी पूल पार केला. त्यावेळी बसचा वेग प्रतीतास 80 किलोमीटर इतका होता. त्यानंतर बस थांबली.

आम्ही ड्रायव्हर स्टेयरिंगवरच बेशुद्ध झाल्याचं पाहिलं. आम्ही त्याला एका बाजूला झोपवलं आणि सीपीआर देण्यास सुरुवात केली. आम्ही सतत छाती दाबली आणि तोंडाच्या माध्यमातून श्वास दिल. जवळपास दीड मिनिटांनी तो शुद्धीवर आला. त्याचा श्वास सुरु झाला.
मनिष तिवारी या प्रवाशानं सांगितलं की, मी ड्रायव्हर बेशुद्ध झाल्यावर लगेच डॉक्टरला फोन केला. त्याला हार्ट अटॅक आला असावा असं सांगितलं. ड्रायव्हरला सीपीआर देण्याची गरज होती. त्यावेळी सर्वांनी मिळून ड्रायव्हरला सीपीआर दिला. मी माझ्या लहान भावाला वाहन घेऊन बोलावलं. त्यानंतर ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा