भांगसीमाता गड हिरवागार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

भांगसीमाता गड हिरवागार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद / प्रतिनिधी – शरणापूर जवळील भांगसीमाता गडावर करण्यात येत असलेल्या जल, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे काम टेकडी पर्यावरण ग्रुपच्यावतीने करण्यात येत आहे. सदरील काम स्तुत्य असून या पर्यावरण रक्षण कामासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
आगामी काळात भांगसीमाता गडावरील वृक्षरोपांना मुबलक पाणी मिळावे यासाठी गडावरील भागात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्याची मोहीम टेकडी पर्यावरण ग्रुपने हाती घेतली आहे. यासाठी वृक्ष, पर्यावरण प्रेमी, जल संवर्धनात कार्य करणाऱ्या संस्थांनी श्रमदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी चव्हाण यांनी केले.
 नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्याची मोहीम, गडावरील वृक्षारोपन, भांगसीमाता गड सुंदर, सुरक्षित व स्वच्छता करण्यासंबंधीची सविस्तर माहिती ग्रुपचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल, श्रीकांत उमरीकर यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना दिली. तसेच यासंबंधीचे निवेदनही दिले. यावेळी टेकडी पर्यावरण ग्रुपचे विष्णू सोमासे, श्याम टरके, विवेक जाधव, यश पंधारे, दत्ता सरोदे, समाधान पांढरे आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा