महाशिवरात्रि निमित्त तीन लाख भाविकांनी घेतले श्री घृष्णेश्वर चे दर्शन
औरंगाबाद/प्रतिनिधी - धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पवित्र श्री क्षेत्र वेरुळ येथे महाशिवरात्र निमित्ताने मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जवळपास तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष शंशाक टोपरे यांनी दिली गेल्या दोन वषार्नंतर भाविकांसाठी महाशिवरात्रि निमित्ताने यात्रा असल्यामुळे या महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भाविक वेरूळ मध्ये दाखल झाले होते.
श्री घृष्णेश्वर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी झाल्यामुळे मंदिर ते शिवालय तिर्थ पर्यंत लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. परंतु दर्शनासाठी भाविकांनी रांगेत तासन्तास उभे राहून दर्शन घेतले त्यांना खूप वेळ थांबावे लागले याचे कारण असे की व्हीआयपी दर्शन,प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी महसूल अधिकारी अधिकाऱ्यांचे मित्र राजकारणी लोक यांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते त्यामुळे दर्शनासाठी उन्हात उभे असलेल्या भाविकांना याचा जास्तीचा वेळ उन्हात उभे राहून त्रास सहन करावा लागला.तर काही भाविकांनी कलश दर्शन घेऊनच परतले.
_वेरुळ येथे यात्रेनिमित्ताने राट पाळणे तमाशा, खेळणी च्या वस्तू, भांड्याचे दुकान, छोट्या मोठ्या हॉटेल्स, रसवंती, फळांचे दुकाने दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी दुकाने आले होते
भाविकांच्या सुरक्षा मध्ये वाढ करण्यात आली होती .भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेट्स छुपे कॅमेरे ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशामक दल, मोबाईल टावर, अन्नसुरक्षा, कंट्रोल रूम, पार्किंग व्यवस्था, तगडा पोलिस बंदोबस्त, खाजगी सुरक्षा व्यवस्था, तैनात करण्यात आली होती श्री घृष्नेश्र्वर देवस्थान कमिटी ब्रह्मवृंद वेरूळ येथील ग्रामपंचायत चे पदाधिकारी या सर्वांनी भाविकांच्या सेवेसाठी सहकार्य केले.
दर्शनासाठी येण्या-जाण्याचा मार्ग वेगवेगळा असल्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले.
वेरूळ मार्गे जाणारी सर्व वाहतूक जाणाऱ्या सर्व गाड्या कसाबखेडा बायपास मार्गे सोडण्यात आल्या होत्या.
शासकीय महापूजा महा शिव रात्री ला बारा ते एक असल्यामुळे गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आला होता..
मंदिर ते शिवालय तीर्थकुंड पर्यंत पालखी मिरवणूक.
देवाच्या पालखीचे शिवालय तीर्थकुंडात स्नान पूजन करून पालखी परत मंदिरात आणण्यात आले.
महाशिवरात्रीच्या दिवशी मंगळवारी दुपारी मुखवटा घालून पालखीत मुखवटा ठेवून सवाद्य मिरवणुकीने शिवालय तीर्थकुंडा जवळ आणली जाते, यालाच देव शिवालयात स्नानास निघाले असे म्हटले जाते. शिवालय तीर्थ हे प्राचीन व पवित्र असून अहिल्याबाई होळकर यांनी या तीथार्चा जीर्णोद्धार केलेला आहे. शिवालय तीर्थात महादेवाची ८ मंदिरे आहेत. देव या तीर्थात आल्यानंतर प्रत्येक तीथार्पाशी जावून समंत्र स्नान करण्यात येऊन व तेथे चल घ्रुश्नेश्वराची आरती करून आणि नंतर देवास पुन्हा मंदिराकडे सवाद्य मिरवणुकीने नेण्यात आले.
वेरूळ परिसरात जागेअभावी पार्किंग व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे वाहनांच्या रांगा वेरूळ तांडा, कसाब खेडा रोड आणि खुलताबाद घाटापर्यंत दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये देवस्थान कडून फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती .वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ महेश चोपडे,डॉ थोरात यांचे पथक भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होते मोफत उपचार करून औषध वाटप करण्यात आले.
श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशांक टोपरे विश्वस्त , योगेश वीटखेडे,सुनील जोशी, विक्की दांडगे, रवी पुरानीक ,रवींद्र वैद्य, संजय वैद्य, चंद्रशेखर शेवाळे, रेखाताई ठाकरे, संजय जोशी, सुनील शास्त्री, दीपक शुक्ला ,योगेश टोपरे, सुनील विटेकर, राजू कौशिक, केदार जोशी, रावसाहेब अग्निहोत्री, शैलेंद्र दांडगे, बाबरेकर, मंगेश पैठणकर, .आणी ब्राह्मव्नद सहकारी यांनी यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी दिवसभर परिश्रम घेतले.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस हे त्यांच्या सहकार्य सोबत लक्ष ठेवून होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता