खडी मिक्सरची दुचाकीला धडक

खडी मिक्सरची दुचाकीला धडक

संभाजीनगर / प्रतिनिधी - दर्गा चौकात मंगळवार (१८ फेब्रुवारी) रात्री दहाच्या सुमारास भरधाव खडी मिक्सर हायवाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा बुरखा हायवाच्या चाकात अडकला. त्यामुळे ती चाकात ओढली गेली. पहाटे ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. सईदा अखिल शेख (३२, रा. मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला. दरम्यान,

पोलिसांच्या माहितीनुसार, सईदा या पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या शेख मोहंमद अझहर (३४, रा. आरेफ कॉलनी) यांच्यासोबत राहायच्या. मोहंमदनेच त्यांना मुकुंदवाडीत घर भाड्याने घेऊन दिले होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मोहंमद हे सईदा यांना दुचाकीवर दर्गा चौक परिसरात पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन गेले होते. दोघांनी पाणीपुरी खाल्ल्यानंतर पार्सल घेतले. त्यानंतर दुचाकीवरून बीड बायपासकडे निघाले.

दरम्यान, दर्गा चौकात मागून आलेल्या भरधाव खडी मिक्सर हायवाने (एमएच २० जीझेड २२९९) निष्काळजीपणे दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मोहंमदचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. सईदांचा बुरखा हायवाच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे त्या चाकाखाली ओढल्या गेल्या.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा