कारची ट्रकला जोरात धडक

कारची ट्रकला जोरात धडक

बीड येथून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या कारने धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा जवळ उभे असलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील चार जण जागी ठार व दोन जण गंभीर जखमी झाले.
ही घटना बुधवार दिनांक एक जानेवारी 25 रोजी घडली. हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने कारला बाहेर काढून त्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले.

धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळ्याजवळ ट्रक क्रमांक के ए 32 डी 92 83 हा नादुरुस्त उभा होता या दरम्यान बीडहून संभाजीनगर कडे जाणारी आय ट्वेन्टी कार क्रमांक एम एच 20 सी एस 60 41 ही कार जात असताना मागून जोराने धडक दिली धडक एवढी जोरात होती की कार ट्रकच्या मागील बाजूला जाऊन बसली त्यातच चार ठार व दोन गंभीर जखमी झाले

अपघात एवढा जोराचा झाला की आवाज मोठा झाल्यामुळे महाकाळा येथील अनेक ग्रामस्थ येऊन कारला बाजूला काढून त्यातील गंभीर झालेले व्यक्ती ला ॲम्बुलन्स च्या साह्याने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवले या घटनेची माहिती कळतात गोंदी पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृत व्यक्तीला शेव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाठवत आली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा