दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके

दिल्ली एनसीआरमध्ये सोमवार १७ फेब्रुवारी रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक जागे झाले आणि घाबरून घराबाहेर पळाले. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असून त्याची तीव्रता 4 एवढी मोजण्यात आली. तिव्रता 4 असली तरी भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत असल्याने आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे ५:३६:५५ वाजता नवी दिल्लीत ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की इमारती हादरू लागल्या आणि लोक घराबाहेर पडले. झाडांवर बसलेले पक्षीही मोठ्या आवाजात इकडे तिकडे उडू लागले. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती. त्याचे केंद्र नवी दिल्लीत जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होते. ते 28.59 अंश उत्तर अक्षांश आणि 77.16 अंश पूर्व रेखांशावर होते. कमी खोली आणि केंद्र दिल्लीत असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाची तीव्रता जास्त जाणवली.