शहरातील 50 वसाहतींची नावे बदलणार
औरंगाबाद/ प्रतिनिधी - शासनाच्या नवीन आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील जाती वाचक गावे, वसाहती,नगर,कॉलोनी,चौक यांची नावे बदलण्यात येणार आहेत.
आदेशानुसार जिल्ह्य प्रशासनाने बैठक घेउन जिह्यातील जातीवाचक वसाहतींच्या नावांच्या यादीचे सादरीकरण करण्यास सांगितले. यादीनुसार जिह्यातील 9 तालुक्यातील, नगर पालिका ,नगरपरिषद या मध्ये एकूण 497 गावे, वसाहती आढळून आल्या असून महानगरपालिका हद्दी मधील 50 कॉलोनी ,वसाहती ,नगर ,चौक यांचा यामध्ये समावेश आहे. वॉर्ड क्र. 1 ते 9 पर्यंत अनेक वसाहती असून या मध्ये कुंभार गल्ली,माळीगल्ली ,चांभार वाडा ,मोची मोहल्ला ,तेलंगवाडा ,बोहरी कठडा, पारधीपूरा,भोईवाडा,बौद्धवाडा,धनगर गल्ली, कोळी वाडा, सोनार गल्ली, कैकाडी वाडा, खाटीक गल्ली भाटनगर, जोहरी वाडा असे एकूण 50 नावाची यादी मनपा ने राज्य व जिल्हा प्रशसनाकडे दिली आहे. या सर्वा वसाहतींना व कॉलोनीला नवीन नावे दिली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.