आ. दानवे कसे खेळले क्रिकेट पहा व्हिडिओ
औरंगाबाद/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रिकेट प्रीमियर लीगच आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं होतं.या वेळी आ. दानवे यांनी अगदी आवडीने क्रिकेट खेळाचा आनंद घेतला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर मराठा क्रिकेट प्रीमियर लीग च आयोजन करण्यात आलं आहे. या टेनिस बॉल व क्रिकेट स्पर्धांसाठी जिह्यातील व शहरातील जवळपास 16 टीम सहभागी झाल्या आसून यासाठी शहरातील मराठा समाजातील विविध क्षेत्रातील राजकीय ,सामाजिक उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी सदर स्पर्धाच आयोजन केले आहे.
आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे याचा हस्ते या प्रीमियर लीग स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले या वेळी खेळाडूना प्रोत्साहन व मार्गदर्शन करताना आमदार दानवे यांनी शैक्षणिक क्षेत्राशिवाय क्रीडा { स्पोर्ट्स)क्षेत्रात सुद्धा मराठा समाजातील युवकांनी आपले करियर केले पाहिजे ,तसेच अशा विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे आणि स्पर्धाना मी सतत सहकार्य योगदान करत राहिल असे आश्वासन दिले. मराठा लीगसाठी आमदार अंबादास दानवे यांनी विशेष मदतीची घोषणा केली.