युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसाचा दौरा होताच माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटाच्या वाटेला
जालना /प्रतिनिधी - जालन्यात शिवसेनेचा चेहरा असलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असेल असे बोलण्यात येत आहे.खोतकर मागील काही दिवसापासून ईडीच्या रडारावर आहेत. त्यांचा साखर कारखाना घर आणि इतर ठिकाणी ईडीने सातत्याने कारवाई केली होती, तसेच या काळात सेनेत ते एकटे पडल्याचे दिसून येत होते. यामुळे खोतकर निराश असल्याची चर्चा देखील होती. त्यानंतर राज्यात शिवसेनेत पडलेली फुट आणि झाले सत्तांतर यामुळे खोतकर पुन्हा चर्चेत आले आहेत.
दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मागील काही दिवसातील शिंदे खोतकर यांची ही दुसरी भेट होती, तसेच खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.
अर्जुन खोतकर दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेनिमित्त ठाकरे यांची औरंगाबाद येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये सभा झाली होती. त्या सभेमध्ये खुद आदित्य ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांचं कौतुक केले होते मात्र आदित्य ठाकरे परतीच्या वाटेला जाताच अर्जुन खोतकर हे शिंदे गटाच्या वाटेला.