नदीवरील पुलावरून बस कोसळली

नदीवरील पुलावरून बस कोसळली

पीसीएन /प्रतिनिधी - बुर्किना फासोला ला जाणाऱ्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता  पश्चिमेकडील  केनिबा शहराजवळील एका नदीवरील पुलावरून बस कोसळून मंगळवारी मालीत किमान 31 जण ठार झाले. अशी माहिती परिवहन मंत्रालयाने दिली. 

मालीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
46 दिवसांपूर्वी माली येथे एक रस्ता अपघात झाला होता. यावेळी बस आणि ट्रकची धडक झाली, यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.

बस बुर्किना फासोला जात असताना स्थानिक वेळेनुसार सुमारे 5 वाजता हा अपघात झाला, असे त्यात म्हटले आहे की, पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणचे नागरिक या बसमधून प्रवास करत होते.
ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

2023 मध्ये यू.एन.च्या माहितीनुसार, जगातील अपघाती मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे आफ्रिकेत होतात.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा