महानगरपालिकेची धडक कारवाई मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली

महानगरपालिकेची धडक कारवाई मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली

 औरंगाबाद /प्रतिनिधी - महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील वाहतुकीस अडथळे ठरणारे  अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.सदर मोहीमे मध्ये एकूण लहान-मोठे 20 अतिक्रमण धारकावर कारवाई करण्यात आली.
   सर्वप्रथम जिल्हा परिषद कार्यालया लगत  असलेले तीन लोखंडी टपरी व  हात गाडी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. यानंतर औरंगपुरा पिया मार्केट मनपाच्या जागेवर  5 बाय सात आकाराच्या मध्ये एका फळविक्रेत्याने  दोन फूट उंचवटा बांधून आपले दुकान थाटले होते ते अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. मनपा पिया मार्केट लगत पाच बाय 5 लोखंडी टपरी निष्कासित करून जप्त करण्यात आली. याच परिसरात  सर्व अतिक्रमणे काढण्यात आले यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळ्यापासून जिल्हा परिषद रोडवरील एकूण सात चप्पल बूट विक्रेता  अतिक्रमण धारककाविरुद्ध कारवाई करण्यातआली. गणेश साबुदाणावडा या मालकाच्या तीन हातगाड्यावर कारवाई करून एक गाडी जप्त करून अतिक्रमणधारकांना सक्त  ताकीद देण्यात आली. सदर  कारवाई प्रशासक  अस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई ,मनपा पोलीस पथक यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती सय्यद जमशेद यांनी दिली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा