ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी भाजप-शिवसेनेची युती आवश्यक - आनंद रेखी

ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी भाजप-शिवसेनेची युती आवश्यक - आनंद रेखी

मुंबई / प्रतिनिधी -  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस मुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्राला गमवावे लागले. हे दोन्ही पक्ष बहुजन विरोधी आहेत, असा आरोप भाजप नेते आनंद रेखी यांनी केला आहे.मध्यप्रदेशातील शिवराज सिंह सरकारने जे करून दाखवले ते राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला करून दाखवता आले असते.

पंरतु, सत्तेतील घटक पक्ष एनसीपी आणि कॉंग्रेसलाच ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व नको असल्यामुळे या प्रक्रियेत हेतुपुरस्सर दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप देखील रेखी यांनी केला आहे. अशात ओबीसींच्या राजकीय आरक्षण केवळ भाजप-शिवसेनेची युतीच मिळवून देवू शकते,असा दावा रेखी यांनी केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना या अनुषंगाने प्रयत्न करण्यात आले. न्यायालयात वेळोवेळी आरक्षणाची भक्कम बाजू मांडण्यात आली. पंरतु, महाविकास आघाडी सरकारने इम्पेरिकल डाटा संबंधी घातलेला घोळ ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी मारक ठरला. सरकारच्या हातात बराच वेळ असतांना देखील डाटा गोळा करण्यात वेळकाढूपणा करण्यात आला.

जिल्हानिहाय, तालुका निहाय माहिती गोळा केली नाही.अशात,आरक्षणाचे पुरस्कर्ते असलेले भाजप-शिवसेना सरकार सत्तेत असते तर ही माहिती अवघ्या काही दिवसांमध्येच गोळा करता आली असती. पंरतु, आता शिवसेना सत्तेत असून देखील त्यांचे मित्रपक्ष आरक्षण विरोधी असल्याने त्यांना काही एक करता येत नाही. त्यामुळे बहुजनांच्या हितासाठी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेने एकत्रित यावे, असे आवाहन पुन्हा एकदा आनंद रेखी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा