मनपा शाळेतील 10 वीच्या मुलींना स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन
औरंगाबाद/ प्रतिनिधी - शहाबाजार येथील महानगरपालिका माध्यमिक शाळेत विद्यार्थीनी साठी स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.स्टुडंट पोलीस कॅडेड कार्यक्रमा अंतर्गत स्वसंरक्षण व आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्तालय यांचे तर्फे पो.नायक निर्मला निंभोरे ,पो.ना.आशा गायकवाड, पोa.अंमलदार प्रल्हाद जाधव ,मा.नगरसेविका फिरदोस रमजानी ,मुख्याध्यापिका खान रईसा बेगम यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींना व्यसन मुक्ती,वृद्ध व्यक्तींना मदत करणे व स्वसंरक्षण कसे करावे या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याससोबत च आपले उच्च शिक्षण कसे घ्यावे याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी पो.ना.निंभोरे यांनी स्वसंरक्षणा बाबत व श्रीमती रमजानी यांनी उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. पोलीस आपले मित्र आहेत सदैव अडचणीत पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन निंभोरे यांनी यावेळी विद्यार्थिनींना केले. वर्ग ८ ते ९ यांचे साठी कराटे प्रशिक्षण वर्ग व १० वीच्या विद्यार्थिनी साठी शासनाचा स्वसंरक्षण प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात आले आहे.यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती शाहबानो ,आबेदा बेगम,फौजिया मींनाज सुलताना,फहमीदा बानो,सबिना खान ,विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.