लेट लतिफांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
औंगाबाद/प्रतिनिधी- वार्ड कार्यालय क्र.6 ई येथील कर्मचारी वेळोवेळी सुचना व नोटीस बजावण्यात येऊनही वेळेवर उपस्थित रहात नसल्याने आज सहाय्यक आयुक्त तथा वार्ड अधिकारी यांनी सकाळी कार्यालयाच्या दरवाजात उभे राहून लेटलतिफ कर्मचारी यांचे नववर्षाच्या दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
नववर्षाच्या औचीत्य साधून प्रभाग वॉर्ड कार्यालय सिडको 6 चा वॉर्ड अधिकारी ए ठरपे यांनी सतत वॉर्ड कार्यलयात उशीरा हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देउन किमान या पूढे तरी कामावर वेळे वर या अपेक्षेने झोन अधिकारी यांनी गांधीगिरी करत सत्कार केला.
वॉर्ड अधिकारी ठारपे यांनी सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम वेळे वर येण्याची विनंती सुचना केल्यात ,नंतर नोटीस सुद्धा दिल्या पण लेटलतीप कर्मचारी काही वेळेवर येण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने अखेर नववर्षाच्या पहिल्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने वॉर्ड अधिकारी यांनी सकाळी कामावर उशिरा हजर होत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देउन सत्कार केला आणि या पुढे किमान कामावर वेळे वर हजर व्हा अशा सूचना केल्या.