आता १ ली ते ७ पर्यंतच्या शाळाही सुरू होणार

आता १ ली ते ७ पर्यंतच्या शाळाही सुरू होणार

औरंगाबाद / प्रतिनिधी - शासनाने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शाळा सुरू करण्यास दी.२४ जानेवारी पासून परवानगी दीली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जील्हा आपत्ती व्यवस्थापनाची  बैठक  दिनांक 31 जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीमध्ये  औरंगाबाद जिल्हयातील ग्रामीण भागातील१ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास  मान्यता देण्यात आली.

परंतु सर्व अटी व नियमांचे पालन करत दिनांक 1 फेब्रुवारी <२०२२ पासून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
1.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) झालेले असावे.
2. शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे 0 नेमग रीलसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी (आरोग्य अधिकारी) संपर्क साधून नियोजन करावे.
3. दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गट
शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल शासनास सादर करावा.
4. शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे
काटेकोरपणे पालन करण्यात यावे. स्थानिक
परिस्थितीनुसार कोविड-१९ संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सुचना निश्चित कराव्यात.
5. विद्यार्थ्याच्या पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र भरुन घेण्यात यावे.
6. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अध्ययन व अध्यापनासाठी पूर्णवेळ शाळेत उपस्थित रहावे.
7. शाळा मुख्याध्यापकांनी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांचेमार्फत दैनंदिन उपस्थितीचा अहवाल सादर करावा.
वरील सूचनांशिवाय शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीचे काटेकोर पालन करण्यात यावे.
या सर्व नियमांचे पालन करत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा