राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते गोल्डन स्पन अँड इन्फ्रा एलएलपी प्रोडक्टसचे उदघाटन संपन्न
वैजापूर / प्रतिनिधी : सर्वसामान्यांच्या आयुष्यात विविध समस्या आणि अडथळे कायम येत असतात. हाजी अकिल यांचे जीवन देखील संघर्षमय राहिले. त्यांच्या अथक प्रयत्न व ध्येयामुळे ते आज उद्योजक म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी सुरू केलेल्या उद्योग समूहातून अनेकांना रोजगार मिळत असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैजापूर येथील गोल्डन स्पन प्रोडक्टसच्या उदघाटन प्रसंगी केले. येथील हाजी शेख अकिल यांच्या खंडाळा ता. वैजापूर येथे नव्याने सुरू झालेल्या गोल्डन स्पन अँड इन्फ्रा प्रोडक्टसचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार रोजी संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
मेहनत, जिद्द आणि ध्येय ज्यांच्याकडे असते त्याला विकास आणि प्रगतीचे मार्ग कठीण नसतात असे स्पष्ट करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हाजी शेख अकिल यांच्या गोल्डन प्रोडक्टस प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती जीवनलालजी संचेती होते. खा. इम्तियाज जलील, आमदार प्रा. रमेश बोरणारे , माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भाऊसाहेब काका ठोंबरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती,साबेर खान, उमेश वाळेकर, राजुसिंह राजपूत, विशाल संचेती, अविनाश गलांडे, प्रशांत सदाफळ जिल्हा बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतिष ताठे, आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी , व्यापारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आले. खंडाळा येथील स्मशानभूमीच्या जागेचा तिढा सोडवण्यासह गावात अंतर्गत रस्ते व ड्रेनेजलाईनसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा यासाठी तातडीने मंजुरी देवू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. वैजापूर सोबत कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले वैजापूर वासीयांनी जे प्रेम व आदरातिथ्य केले याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले.