औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस
औरंगाबाद /प्रतिनिधी- हवामान विभागाने दिनांक 28 व 29 डिसेंबर रोजी अनेक जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा देखील समावेश होता. हवामान विभागाच्या अंदाजनुसार औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज गारपिटीसह मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.
वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गारांचा पाऊस पडला. निमगाव खैरी येथे मुसळधार पावसासह गारपीट सुरू आहे.वाळूज येथे पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या.