रेड्डी कंपनी च्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा निर्णय गुलदस्त्यात पहा व्हिडिओ

औरंगाबाद/ प्रतिनिधी - रेड्डी कंपनी चा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासाठी आज झालेल्या बैठकीत समाधान कारक तोडगा नाही निघाल्याने ,येत्या काही दिवसात शहरातील सर्वपक्षीय  संघटना ची चर्चा करून दिशा ठरवली जाईल अशी माहिती कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात यांनी दिली.

औरंगाबाद शहरातील कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी हैदराबाद येथील पी गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीला ठेका दिला आहे,या कंपनी मध्ये जवळपास 1 हजार 70 वाहनचालक व सफाई कर्मचारी काम करतात,या कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून वेतनवाढ देण्यात आलेली नाही.
या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या सुधारित वेतन नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे ,अशी मागणी कामगार शक्ती संघटनेच्या वतीने करीत 14 फेब्रुवारी रोजी रेड्डी कंपनीचा सर्व कर्मचाऱ्यांनी संप करत काम बंद आंदोलन केले होते.
या वेळी आमदार अंबादास दानवे यांनी मध्यस्थीने 21 फेब्रुवारी रोजी निंर्णय घेऊ असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन माघे घेण्यात आले होते .
या नुसार आज दिनांक 21फेब्रुवारी रोजी सदर बैठक घेण्यात आली.या वेळी आमदार अंबादास दानवे ,मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय ,घनकचरा व उपायुक्त सौरभ जोशी ,रेड्डी कंपनी चे प्रतिनिधी व कामगार संघटनेच्या गौतम खरात यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कंपनीने कर्मचाऱ्यांना जेष्ठता नुसार वेतनवाढ देण्याचे मान्य करत 1600रु 1100रु आणि 700 रुपये वाढ करण्याची हमी दिली. परंतु सुधारित वेतनवाढ द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली .
बैठकीत फारसा तोडगा नाही निघाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एका गटांत नाराजी सूर उमटला होता आणि संतप्त कर्मचारी बाहेर पडले.या कर्मचाऱ्यांना संघटनेचे वतीने आश्वासन देत शांततेचे आव्हान करत लवकर या वर निर्णय घेतला जाईल तो पर्यन्त नियमित काम करावे आशा सूचना संघटनेच्या नेते गौतम खरात यांनी दिली.

या वर लोकप्रतिनिधी आमदार खासदार व इतर पदाधिकारी आणि सर्वपक्षीय व संघटनेचे बैठक घेऊन तोडगा काढला जाईल अशी माहिती खरात यांनी  बोलतांना दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा