कोरोना लसीकरणात हलगर्जीपणा भोवला  सिद्धनाथ वाडगावच्या वैद्यकीय अधिकारी निलंबित

कोरोना लसीकरणात हलगर्जीपणा भोवला  सिद्धनाथ वाडगावच्या वैद्यकीय अधिकारी निलंबित

औरंगाबाद/ प्रतिनिधी- कोरोना लसीकरणा मध्ये हलगर्जीपणा करणे, मुख्यालय हजर न राहणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करणाऱ्या गंगापुर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तडकाफडकी निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.

गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी  डॉ. चित्रा बिऱ्हाडे  यांनी कोरोना लसीकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी औरंगाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केल्याची घटना आज (7 डिसेंबर ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समोर आली.

 वैद्यकीय अधिकारी डॉ.  चित्रा बिऱ्हाडे यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी  मला जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार सोमवार (२२ नोव्हेंबर ) रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके  यांनी डॉ. चित्रा बिऱ्हाडे यांच्या संदर्भातील सविस्तर माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. या अहवालावरून जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनी डॉ. चित्रा बिऱ्हाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

 सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  डॉ. चित्रा बिऱ्हाडे  सहा वर्षापासून कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रातंर्गत ५५ गावे असून पन्नास हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. या परिसरात कोरोना  लसीकरण कमी प्रमाणात झाले असल्याची माहिती समोर आली. या अनुषंगाने आरोग्य अधिकारी शेळके यांनी कोरोना लसीकरणावर लक्ष देऊन लसीकरणाची टक्केवारी वाढवणे संदर्भात आदेश दिले होते. हा राग मनात धरून त्यांनी आरोग्य अधिकारी शेळके त्रास देत असल्याची तक्रार केल्यामुळे  डॉ. चित्रा बिऱ्हाडे यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा