रानडुकरांनी घेतला माणसांचा जीव
वर्धा/ प्रतिनिधी - अचानक रस्ता ओलांडताना रानडुकरांचा कळप समोर आला. रानडुकराला फॉरचूनर कारने धडक दिल्याने कार पलटी झाली,
तर मागून येणाऱ्या एका कारने सुद्धा रानडुकरापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. यात ती पलटी झाली.
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन रानडुकरे अपघातात ठार झाली आहेत. जखमींना सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. मृतांमध्ये लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियूष जगताप कर्मचाऱ्यांसह दाखल.
याच सेलसुरा येथील परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता, त्या अपघातात सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता.