शिक्षण विभागाचा वरातीमागून घोडे - परीक्षा एप्रिल मध्ये तर निकाल 'मे' मध्ये लावा असे परिपत्रक जारी
मुंबई / प्रतिनिधी : राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केले आहेत. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत असेही निर्देश दिले आहेत. राज्यात 24 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णवेळ एप्रिल अखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरुवारी दिले आहेत. त्याबरोबरच कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरुपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थिती शिक्षण विभागाने परवानगीही दिली आहे. मात्र या निकालाचा शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध केला जातोय. अनेक शाळांच्या परीक्षा झाल्या आहेत परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे आजी परिपत्रक गुरुवारी शिक्षण मंडळाने जारी केल्याने शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे.