कोणालाही लस कमी पडू देणार नाही - अनिल चोरडिया
औरंगाबाद/ प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडीया यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थाच्या वतीने औरंगाबाद पश्चिम तालुक्यासाठी बजाजनगर व आजूबाजूला असलेल्या सर्व गावांसाठी आवश्यक असेल तेवढी लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या मोहिमेचा शुभारंभ दी. 16 सप्टेंबर रोजी मोहटादेवी मंदिर बजाजनगर या ठिकाणी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था अध्यक्ष सी.पी. त्रिपाठी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इपका लॅबोरेटरी प्लांट हेड व्यंकट मैलापुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा परिषद सदस्य ज्योती चोरडिया, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, आरोग्य अधिकारी सुवर्णा इंगळे, यादवराव पडवळ, सुनील माळी, माजी सरपंच पंढरपूर संतोष चोरडिया, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य दादासाहेब खणसे पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस विजय सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया, ओबीसी मोर्चा तालुका प्रमुख सुदर्शन वाघ, महिला तालुकाध्यक्ष सुनीता अहिरे, शहर उपाध्यक्ष राजाराम पाटील, माधव केदार, गणेश सोनवणे, भानुदास खालकर, भारत मोटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश पुंड, आशिष पावडे, रवि म्हस्के, शिवाजी कदम, शिवाजी आव्हाड, हरिभाऊ पानधोंडे, परमेश्वर पालवे, हरिभाऊ बुरंगे, शिवाजीराव कदम, किशोर राका, चंद्रकांत चोरडिया, भारती गुगळे रुचिका जैन सुमित कुचेरिया यमराज गिरे रेखा डिसुजा, संजय मोरे, आकाश पवार, प्रदीप पाटील, अर्जुन गालफाडे, पांडुरंग भारस्कर, बाळू भागवत, बालाजी तांमलवार बालाजी येरेकर आशिष धुमाळ सचिन रोकडे, भुषण अग्रवाल, सत्यशीला बुरंगे, भाऊसाहेब पवार, संपत भराड, अशोक कदम, रामेश्वर कदम, संजय तायडे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.