लग्नाच्या निमित्ताने मित्रांचे गेट-टुगेदर

लग्नाच्या निमित्ताने मित्रांचे गेट-टुगेदर
कन्नड/ प्रतिनिधी - उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आली या महिन्यातील सात तारखे लग्नाची दाट तिथी आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे 7 मे रोजी रुख्मिणी लॉन्स येथे देखील एक लग्न आहे परंतु या लग्नाची वैशिष्ट्य म्हणजे वधू ने आपल्या लग्नाला तब्बल दहा वर्षानंतर सर्व मित्रांना एकत्र आणण्याचे निश्चित करून लग्नाला गेट-टुगेदर चे रूप दिले आहे.           कन्नड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब देशमुख या विद्यालयातील 2014 च्या बॅचचे सर्व वर्गमित्र एकत्र येणार आहेत. पूजा व विकास यांच्या विवाह प्रसंगी तब्बल दहा  वर्षानंतर सर्वांनी भेटायचे ठरवले.  शाळेनंतर प्रत्येक जण आपल्या करिअरमध्ये कुणी व्यवसायामध्ये व वेगवेगळ्या कामात गुंतलेला असतो परंतु वर्ग मित्राला भेटायचं आनंदच वेगळा त्यामुळे पूजा आणि विकास यांच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व वर्गमित्र एकत्र येणार आहेत. माझ्या लग्नाच्या निमित्ताने सर्व वर्गमित्र आम्ही एकत्र येणार माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असे मत पूजा यांनी व्यक्त केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा