पेट्रोल 54 रु.लिटर ...मनसे

पेट्रोल 54 रु.लिटर ...मनसे

औरंगाबाद / प्रतिनिधी -  113 रु.लिटर पेट्रोल अचानक 54 रु. कसे झाले याचे आश्चर्य सर्वांनाच वाटत असेल, परंतु ही सुविधा एका विशेष कारणामुळे देण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावर 54 रुपये लिटर पेट्रोल वाटप करण्यात आले.  पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना कुपन चे वाटप केले.


 दि. 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 54 वर्षाचे झाले.  त्यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त औरंगाबादच्या नागरिकांना एक विशेष भेट देण्यात आली.  मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दि. १४ जून रोजी क्रांती चौक पेट्रोल पंप येथे 54 रुपयाने प्रत्येक नागरिकाला एक लिटर पेट्रोल भेटणार असे जाहीर केले. त्यामुळे आज सकाळी 6 वाजेपासूनच नागरिकांनी क्रांतीचौक पेट्रोल पंपावर खूप गर्दी केली. पेट्रोल पंपावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यामुळे क्रांती चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना 54 रुपयांनी पेट्रोल ही नागरिकांसाठी सुवर्णसंधीच आहे. त्यामुळे नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत या संधीचा पुरेपूर लाभ घेतला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा