भर दिवसा अपहरण नाट्य मोबाईल पडल्यामुळे डाव फसला
संभाजीनगर/ प्रतिनिधी - संभाजीनगर मध्ये आज भर दिवसा सिटी चौक या भागात रेकी करून एका सराफा कामगाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अपहरण करणाऱ्यापैकी एकाचा मोबाईल खाली पडल्यामुळे त्यांचा डाव फसला.
छत्रपती संभाजी नगर येथील मुख्य चौकापैकी एक असणाऱ्या सिटी चौकात भर दिवसा आज एका सराफा कामगाराच्या अपहरणाचे नाट्य घडले. सिटी चौकात अर्धा तास रेकी करून अपहरण कर्त्यानी लक्ष ठेवले व अवघ्या 15 सेकंदात सराफ कामगाराला कार मध्ये कोंबले. परंतु अपहरण करताना एका अपहरणकर्त्याचा मोबाईल खाली पडला. अपहरणकर्त्यांच्या हे लक्षात आले नाही व ते तसेच निघून गेले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मोबाईल जप्त केला. अपहरनकर्त्यांनी मोबाईल कुठे आहे हे तपासण्यासाठी त्या मोबाईलवर फोन केल्यास पोलिसांनीच तो फोन उचलला पोलिसांना सर्व माहित आहे हे कळतच अपहरणकर्ते पोलिसांना शरण आले.
अपहरणाचे कारण काय
पोलिसांनी अपहरणकर्त्याना अपहरणाचे कारण विचारले असता त्यांनी सर्व सत्य पोलिसांना सांगितले. सराफा कामगाराने सोने घेऊन देतो म्हणून अपहरण कर्त्यानकडून 8 लाख रुपये घेतले होते आणि सोने मात्र दिले नाही. शेवटी कंटाळून त्यांनी आठ लाख रुपये परत मागितले असता सराफा कामगार ते देण्यास देखील टाळाटाळ करत होता. त्यामुळे शेवटी त्यांनी त्याला अपहरण करून 8 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा विचार केला. परंतु मोबाईल खाली पडल्यामुळे त्यांचा डाव फसला.