महानगरपालिका विद्युत व शिक्षण विभागाचा गलथान कारभार
औरंगाबाद /प्रतिनिधी - महानगरपालिका विद्युत व शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील मनपा शाळातील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत आसून याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे,पण वीज नसल्याने वर्ग अंधारात तर विद्यार्थी संगणक वर्गा पासून वंचीत राहत आहेत.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरात जवळपास 71 मराठी उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक आणि 11 केंद्रीय शाळा चालविण्यात येतात. यात 10 हजार 915 विद्यार्थी संख्या आसून 437 शिक्षक शिक्षिका कार्यरत आहेत.
या बहुतांश शाळा मनपाच्या जागेत तर काही खाजगी जागेवर भाडेतत्त्वावर चालतात. या सार्वना स्वतंत्र वीज पुरवठा देण्यात आलेला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा विद्युत व शिक्षण विभागाच्या वतीने या शाळेतील वीज बिल भरण्यात करण्यात येते पण गेल्या काही दिवसापासून मनपाच्या शहरातील काही शाळेचे वीज बिल न भरल्यामुळे सध्या येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना निःयमित चालणाऱ्या कम्युटर( संगणक) वर्ग बंद आसल्याने संगणक तासापासून वंचीत रहावे लागत आहे. एवढेच नाही तर अंधारात अध्यपनाचे धडे घ्यावे लागत आहेत. काही शाळेत नेहमी साप व विंचू निघतात या मुळे वर्गात लाईट असणे आवश्यक आहे.
सुत्रांच्या माहिती नुसार संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी सतत या बाबत पाठपुरावा करून खंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पत्र व्यवहार केला, परंतु मनपा विभागातील गलथान कारभारात सदरील फाईल टेबलावरच अडकली आहे. 20 डिसेंबर सोमवार पासून इयत्ता 1 ली ते 7 वि वर्ग सुरू होत आहे ,या साठी अनेक मनपा शाळेने मुलांचा स्वागताची जयंत तयारी केली आहे ,पण यात काही शाळेत मुलाचं स्वागत अंधाऱ्या वर्गात होणार हे नक्की.