श्री नारायणा मार्शल आर्टच्या वतीने  मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबिर

श्री नारायणा मार्शल आर्टच्या वतीने  मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबिर

वाळुज/ संजय काळे - बजाज नगर मध्ये दिनांक 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत नाताळच्या निमित्ताने श्री नारायणा मार्शल आर्ट च्या वतीने मुलांसाठी व मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण मोफत घेण्यात आले.
त्याकरिता सर्व बजाज नगर मधून 300 खेळाडूंनी त्यामध्ये सहभाग नोंदवला व या खेळाडूंना अविनाश वाकोडे सरांनी लाठीकाठी चे प्रशिक्षण दिले. त्याच बरोबर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेहा चौगुले ,महेश गिते, महेश मोरे ,किरण गुलदार , जान्हवी शेलार , वरत जाधव या प्रशिक्षकांनी सुद्धा प्रशिक्षण दिले. वरील सर्व खेळाडूंना श्री नारायणा मार्शल आर्टचे मुख्य प प्रशिक्षिका भाग्यश्री महाबळे यांचे मार्गदर्शन लाभले .सदरील प्रशिक्षण सिडको महा नगर 1 पाण्याच्या टाकीजवळ प्रशिक्षण  दोन टप्प्यांमध्ये चालत असून सकाळी सहा ते आठ व संध्याकाळी सहा ते आठ पर्यंत सुरू आहे या प्रशिक्षणाचे नियोजन ओवीनाम राज्य असोसिएशन चे अध्यक्ष शंकर महाबळे यांनी केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा