सिल्लोड शहरातील प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन
सिल्लोड / प्रतिनिधी - सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा शुक्रवार ( दि.18 ) रोजी स्थापन करण्यात आला. स्थापनेपूर्वी या पुतळ्याची शहरातील मुख्य भागांत मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ फोडून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शिवाजी नगर, समता नगर, शिक्षक कॉलनी, जळगाव रोड, टिळक नगर, शास्त्री कॉलनी, पोलीस स्टेशन परिसर, महावीर चौक, प्रियदर्शनी चौक, सराफा मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संत गाडगे बाबा चौक, श्री. म्हसोबा गल्ली, रोहिदास नगर, गणेश कॉलनी व मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पर्यंत महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक मार्गातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संत गाडगे बाबा, शहीद भगतसिंग चौक, महावीर चौक असे सर्वच महापुरुष व संतांच्या पुतळ्यास तसेच नामफलकास शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या मिरवणुकीत शिवभक्तांनी सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केला. मिरवणुकीत सहभागी शिवप्रेमींनी भगवा फेटा परिधान केले होते. एकूणच शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अवघा मिरवणूक मार्ग भगवामय पहायला मिळाला. शहरात ज्या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ झाली. त्या मार्गात महिलांनी सडा रांगोळीसह फुलांनी सजवून ठेवला होता. विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका वाहनात ठेवून आकर्षक फुलांच्या माळांनी सदरील वाहन सजविण्यात आले होते. पुष्पांची मुक्त उधळण , ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी, डीजे यासह जय भवानी, जय शिवाजींच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते.
मिरवणूक व पुतळा स्थापन सोहळ्या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना संजय जामकर, उपसभापती काकासाहेब राकडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, राजेंद्र ठोंबरे, मारुती पा. वराडे, विशाल जाधव, सतीष ताठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, शहरप्रमुख मेघा शाह, माजी सभापती रेखाताई जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, युवासेनेचे जिल्हाप्रमुख कैलास जाधव, जिल्हा सरचिटणीस शेख इम्रान ( गुड्डू ), नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, शेख सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ , आसिफ बागवान, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके, अनिस कुरेशी , शकुंतलाबाई बन्सोड, मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण, युवासेनेचे धैर्यशील तायडे, अक्षय मगर, शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर,रवी गायकवाड, संतोष धाडगे , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, संजय मुरकुटे, फहिम पठाण, राजू बन्सोड, दता शेजुळ, शिवसेना व्यापारी आघाडीचे अमृतलाल पटेल, गौरव सहारे, आशिष कटारिया, सुनील सनान्से, रवी राजपूत, संतोष खैरनार, आशिष कुलकर्णी, विजय खाजेकर, सुनील लांडगे, नानासाहेब रहाटे, पंजाबराव चव्हाण, दीपक गायकवाड, कैलास इंगे, नासेर पठाण, मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, राजुमिया देशमुख, राहुल प्रशाद, योगेश सनान्से, आनंद सिरसाट, मधुकर बेंडाळे, सुनील इंगळे, संजय फरकाडे, आदींसह शिवप्रेमींची उपस्थिती होती.