अनधिकृत मोबाईल टॉवर चे साहित्य जप्त
औरंगाबाद/प्रतिनिधी - महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने दि 30 नोव्हेंबर रोजी सकाळी जुना बाजार बुढी लाईन येथील रस्त्यावर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या टपऱ्या काढण्यात आल्या व पडेगाव भागात मिसबाह कॉलनी येथे रिलायन्स जिओ कंपनी तर्फे अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणी चे काम सुरू होते त्याचे काम थांबवून साहित्य जप्त करण्यात आले.
जुना बाजार बुढी लाईन या रस्त्यावर अनधिकृतपणे 10x10 व 5 x10 या आकाराच्या 5 टपऱ्या अतिक्रमण पथकाने काढल्या. सदर टपर्या मागील दोन ते तीन महिन्याभरापासून अचानक पणे काही व्यक्तींनी रस्त्यालगत टाकल्या होत्या. टपर्या टाकल्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात होत होते. अनेक नागरिक व वयोवृद्ध यांचे या ठिकाणी अपघात झाल्याने या भागातील नागरिकांनी मा.प्रशासक यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या .त्या अनुषंगाने टपरी धारकांना वेळोवेळी टपरी काढून घेणे बाबत सूचना दिल्या होत्या. परंतु संबंधित टपरीधारक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि टपरी व इतर अतिक्रमण करत होते. याकरिता कारवाई करण्यात आली व एकूण 5 लोखंडी टपऱ्या हटविण्यातआल्या.
यानंतर पडेगाव भागात मिसबाह कॉलनी येथे रिलायन्स जिओ कंपनी तर्फे अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणी चे काम सुरू होते.याबाबतची माहिती यापूर्वीच प्राप्त होती त्या अनुषंगाने मोबाईल टावर उभारण्याचे काम थांबवून साहित्य जप्त करण्यात आले व संबंधित घर मालक यांना 24तास ची नोटीस काढण्यात आली. सदर कारवाई मा. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद अधिकारी वसंत भोये, श्रीमती सोनवणे ,आर एस राचतवार , इमारत निरिक्षक सय्यद रवींद्र देसाई, मजहर अली ,पोलीस निरीक्षक फईम हाश्मी व कर्मचारी यांनी पार पाडली.अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.