शिवसेना संभाजीनगर पश्चिम पदाधिकारी बैठक संपन्न घेण्यात आले महत्वाचे निर्णय
संभाजीनगर /प्रतिनिधी - शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने मान्यवर नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील पदाधिका-यांची बैठक नुकताच पार पडली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , लोकसभा समन्वयक प्रदीपकुमार खोपडे , जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विधानसभा संपर्क प्रमुख संदीप बाबुजी मोरे, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधील शिवसेना ( उबाठा ) पदाधिका-यांची उत्स्फुर्त उपस्थिती पहायला मिळाली. याप्रसंगी समन्वयक प्रदीपकुमार खोपडे यांनी पश्चिममधील सर्व पदाधिका-यांची ओळख करून घेत प्रत्येकाला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला व प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पदाधिका-यांनी आपापल्या संघटनात्मक कार्याचा तपशील दिला. तसेच भविष्यात याहुन अधिक जोमाने काम करू असे आश्वासन दिले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन करताना मागील कार्यकाळात केलेल्या संघटनात्मक, सामाजिक व विकासकार्याचा परिचय करून दिला. तसेच आपल्या अनुभवाच्या जोरावर उपस्थितांना प्रत्येक क्षेत्रात जाऊन शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेले ८०% समाजकार्य जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले. सोबतच येणा-या लोकसभा निवडणुकीत निकराने लढा देण्याचे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी बोलताना आपल्याला मतदार यादी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तपासून नव्याने सामील झालेल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे आहे. हे कार्य आजपासून प्रत्येक पदाधिका-याने हाती घेऊन नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी पदाधिकारी बैठकीचे आयोजक छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी सर्व पदाधिका-यांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे शिलेदार पश्चिमचा हा गड अभेद्य ठेवत येणा-या निवडणुकांमध्ये गद्दारांना नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बप्पाजी दळवी, राजेंद्र राठोड, अरविंद धीवर, रतन साबळे, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते पाटील, तालुका संघटक बाळसाहेब कार्ले, तालुका समन्वयक सचिन गरड, शहरप्रमुख सागर शिंदे, उपतालुका प्रमुख कैलास भोकरे, विष्णु जाधव, सुदाम भंडे, श्रीकृष्ण राठोड, सचिन राठोड, गणेश नवले, कृउबा समितीचे संचालक महेंद्र खोतकर, उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे, बिबन सय्यद, किशोर खांडरे, नामदेव सागडे, विभाग प्रमुख गणेश सुर्यवंशी, काकाजी जिवरग, सतीश हिवाळे, लखन सलामपुरे, संतोष चंदन, त्रिंबक जगताप, विनोद दाभाडे, नंदकिशोर मुळे, गजानन मनोरे, वाहतूक सेनेचे उमर सिद्दिकी, उपविभाग प्रमुख अमोल पोटे, दिपक कानडे, रविंद्र आव्हाड, अंकुश कान्हेरे, उपसरपंच मनीष गाजरे, दुत भगवान भादे, यशवंत चौधरी शाखाप्रमुख अमोल वाघमारे, राजेश बागुल, हरीश पगारे, अजय जाधव, संदीप डोईफोडे, ओमकार उबाळे, ज्ञानेश कडबाने, अनिल जाधव, खलील सय्यद, नजीर शेख, सिद्धार्थ नरसाळे, ओम देशमुख, नितीन चरभरे, सोहेल शेख, रामु सुराशे महिला आघाडीच्या मीराताई पाटील, अनिताताई डहारीया, छायाताई जाधव मीराताई राठोड, अंजलीताई राठोड, कपाटे ताई आदींची उपस्थिती होती.
बैठकीचे सुत्रसंचालन दत्तात्रय वर्पे यांनी, प्रास्ताविक यांनी सागर शिंदे तर आभार विष्णु जाधव यांनी मानले.