विवेकानंद महाविद्यालयात लसीकरण कार्यक्रम संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात लसीकरण कार्यक्रम संपन्न

औरंगाबाद/प्रतिनिधी -  महाविद्यालयातील तासिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी 18 वर्षे वरील विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. यास्तव सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्यासाठी "मिशन युवा स्वास्थ्य- कोविड-19 लसीकरण" या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजीतसिंह निंबाळकर यांनी केले होते.

या पार्श्‍वभूमीवर विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन युवा स्वास्थ्य कोव्हिड-19 लसीकरण मोहीम" कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास वनारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, उपप्राचार्य डॉ. आर.बी. शेजुळ, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील शिवाय महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे,डॉ. सय्यदा सुमय्या, डॉ. प्रमिला कराड, आरोग्य शिक्षण अधिकारी  सतीश ताजी, आरोग्य सेविका श्रीमती उर्मिला नव्हाडे उपस्थित होत्या. या लसीकरण कार्यक्रमात एकूण 100 विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी झालेली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संभाजी फोले, डॉ. भारत गोरे, प्रा. राजेंद्र खाकरे , डॉ. डि.के. इंगळे, प्रा.शर्मिष्ठा ठाकूर कार्यालयीन  अधीक्षक संजय पवार, रामभाऊ वनगुजर तसेच आरोग्य परिचारिका  ज्योती पोटभरे,  सुहासिनी घाटोळकर, अलका धुमाळ शिवाय अश्विनी पाटोडे व मंगल ताकतोडे या आशा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  प्रभाकर मोरे तसेच प्राचार्य डॉ. रामदास वनारे यांनी मार्गदर्शन केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा