शिवशाही बसने का घेतला पेट पहा व्हिडिओ
विश्रांतवाडी: - यवतमाळ - औरंगाबादहून पिंपरी चिंचवडला येत असलेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बस खराडी बायपास येथे आली तेव्हाच इंजिन गरम झाल्याने पाणी बाहेर येत होते. येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात वाडिया बंगल्याजवळ ही घटना घडली.
त्यामुळे सकाळी दहा वाजता सर्व ४२ प्रवाशांना तेथेच उतरविण्यात आले होते. चालक आणि वाहक पुढे गाडी घेऊन जात असताना. अचानक बसने पेट घेतला. चालक व वाहक सुरक्षित बाहेर आले. चालक सुभाष नामदेव पल्लाड व वाहक विलास देवराव पवार दोघेही सिडको औरंगाबाद डेपोचे कर्मचारी आहेत. बसचे जळून पूर्ण नुकसान झाले असून कोणीही जखमी नाही.
घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाने बसची
आग आटोक्यात आणली आहे. यावेळी वाहतुकीची वेळ असल्याने रस्त्यावर खूप गर्दी जमा झाली होती येरवडा पोलिस, वाहतूक पोलिस यांनी वाहतूक नियंत्रित केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दर्शना शेलार यांनी दिली.