जिज्ञासा काळे व सायली काळे यांचे आयएमओ परीक्षेत नेत्र दीपक यश
बजाजनगर/ प्रतिनिधी - जयहिंद पब्लिक स्कुल मधील दोन विद्यार्थिनींनी आयएमओ परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश मिळवले आहे.
जिज्ञासा संजय काळे( इयत्ता 1 ली) तसेच सायली संजय काळे (इयत्ता 6 वी) या दोन विद्यार्थिनींनी आयएमओ परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांना सुवर्ण पदक आणि सन्मान पञ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे .या यशाबद्दल शाळेच्या सचिव चंद्रीका देशमुख , मुख्याध्यापक संदीप गायकवाड, पांङुरंग मुगटराव, विश्वास अंकुश, अमोल देशमुख , कल्याणी कापरे, ङाँ.बी.जी.गायकवाड , क्रांती पब्लिक स्कुलचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव पाटील, विद्यमान अध्यक्ष गणेश जाधव, मुख्यध्यापिका किरण जाधव, आदीनी अभिनंदन केले आहे.