लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
औरंगाबाद/प्रतिनिधी - खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील अल्पवयीन मूलीच्या आईच्या फिर्यादीवरून एका तरुणा विरोधात आज दि 28 एप्रैल रोजी खुलताबाद पोलिस ठाणे येथे बाल लैंगीक अत्याचार कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसाकडून मिळालेली माहितीनुसार खुलताबाद शहरालगत असलेले सूलीभंजन येथील आरोपी संदीप भीमराज पठारे (वय 21 वर्ष) याने एका 13 वर्षीय अल्पवयीन मूलीला लगनाचे आमिष दाखवून आज दि 28 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजेच्या सुमारास शारीरिक संबंध स्थापित केले. मूलीने याबाबत आईला सांगितले असता आईने थेट खुलताबाद पोलिस स्टेशन गाठले.मूलीच्या आईच्या फिर्यादी वरून खुलताबाद पोलिस ठाण्यात आरोपी संदीप भीमराज पठारे याच्या विरोधात बाल लैंगीक अत्याचार कायद्या अंतर्गत कलम 356 व 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक मधुकर मोरे, पोलिस कॉन्स्टबल रमेश छत्रे,मनोहर पुंगळे हे करित आहे.