अखिल भारतीय ग्राहक पंचायत मासिक बैठक संपन्न

अखिल भारतीय ग्राहक पंचायत मासिक बैठक संपन्न

ग्राहकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मासिक बैठक आयोजित केली जाते. या महिन्यात ही बैठक प्रताप नगर येथे घेण्यात आली. महिलांनी शहराचे गंभीर प्रश्न मांडले, यामध्ये महाराष्ट्र विद्युत मंडळा संदर्भात अनेक रस्त्यावरील, काॅलनीतील पोल वर विद्युत तारांचे कुंपण, वेली वाढलेल्या आणि अनेक वेळा तक्रार देऊन ही दखल घेतल्या जात नाही, अधिकारी टोलवा टोलवीचे उत्तर देतात. अनेक काॅलनीत विद्युत तारा मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या मध्ये अडकल्या आहेत. तक्रार करुनही झाडे तोडायला कुणी येत नाही. व नागरिकांना परवानगीही देत नाही. यामुळे वारंवार लाईट जातात. फिल्टर लाईन बंद करुन झाडे काढावी लागतात त्यामुळे अधिकारी परवानगी देत नाही असे लाईन मॅन सांगतात. ही गंभीर तक्रार एम एस सी बी च्या संदर्भात आली आहे. 
दुसरी तक्रार अंतर्गत रस्ताचे काम कायम अर्धवट ठेवतात, रस्त्याच्या बाजूचे पंख काॅनटॅरकटर  कधीच भरत नाही, त्यामुळे पावसाळ्यात अनेक अपघात घडतात. रस्त्यावरील ड्रेनेज धापे खोल गेलेले आहेत, मनपा अधिकारी, वार्ड अधिकारी लक्षच देत नाही, हा आमचा प्रभाग नाही, संग्राम पुलाच्या खाली सर्व धापे रस्त्याच्या आत गेले आहे, पाणी साठले की रस्ता दिसत नाही आणि अपघात होतात. जबाबदार कोण?
संग्राम पुलाखाली अनधिकृत गॅरेज कोण चालवत याची चौकशी करावी व ते गॅरेज त्वरीत काढाव त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. नागरिक म्हणाले की हे गॅरेज वाले खाजगी व्यवसायासाठी सार्वजनिक संपत्तीचा विनाश करतात व सामान्य नागरिकांना त्रास होतो. ग्राहक पंचायत ने दखल घेऊन आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. ग्राहक पंचायत च्या संगीता धारूरकर, प्रांत कार्यवाह, शहर अध्यक्ष भारती भांडेकर बिस्वास यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि तक्रारी जाणून घेतल्या. बेठकीला अनेक महिला उपस्थित होत्या.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा