संगितकार आशिषकुमार बोथरा यांनी वाढदिवसातुन दिली समाजाला नवी प्रेरणा
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबाद येथील प्रसिद्ध जैन संगितकार जैन अलर्ट गृप चे सदस्य आशिषकुमार बोथरा यांचा वाढदिवस मित्र परिवाराने गौशाऴेत गौसेवा वृक्षारोपण अन्नदान मिठाई वितरण इत्यादी सामाजीक उपक्रमाचे आयोजन करून आगऴे वेगऴे सरप्राईज गिप्ट त्यांना दिले मित्र परिवाराच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाला सामाजिक उपक्रमात सहभागीहोण्याच्या सौभाग्यशाली प्रसंगामुऴे त्याचे ह्रदय भरुन आले हा वाढदिवस कधीच विसरु शकणार नसल्याची भावना आशिष बोथरा यांनी व्यक्त केली.
श्री महावीर जैन गौशाऴा चिकलठाणा येथे सकाऴी जैन अलर्ट गृप, सकल जैन युथ संगठन, विमलरत्न भारती मंडल,हडको मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा अभिनंदन समारोह संपन्न केला गौमातेचे पुजन करुन चारा टाकण्यात आला. नंतर गौशाऴेच्या प्रांगणात 30 वृक्षारोपन करुन त्याची जवाबदारी निश्चीत करण्यात आली तसेच गौशाऴेतील कर्मचाऱ्यांना मिठाई वितरीत केली.
नंतर शरणापुर येधील माता पद्मावती मंदीरात दर्शन करुन तेथील गोशाऴेत चारा भेट देण्यात आला. वाढदिवसाला गौसेवा करुन व राष्ट्रीय हिताच्या कार्यात सहभागी होण्याची ही भावना सर्वाच्या मनात निर्माण होण्याची आवश्यकता अलर्ट गृप चे निलेश जैन, सकल जैन युथ संगठन चे हितेश कांकरीया,नवकार मिडीयाचे प्रकाश कोचेटा यांनी व्यक्त केली.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कोचेटा,रिया मंडलेचा, अंकीता छल्लाणी,यानी परिश्रम घेतले उद्योगपती सफल रायसोनी, तुषार जैन, रोहीत छाजेड़ , मनिषजैन, हर्षल बोथरा,सागर बोथरा,अनिकेत गौतम सोनी ,यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
सर्वानी आपल्या जीवनातील, परिवारातील आनंदाच्या क्षणात गौसेवेत अधिक भाग घेण्याचे आवाहान आशिष बोथरा व प्रकाश कोचेटा यांनी शेवटी व्यक्त केले.