सासरवाडीत बायकोला सोडून मेहुणा साली बरोबर फरार
औरंगाबाद/प्रतिनिधी - नवऱ्याची जातच खोडीची एका नवऱ्याने पत्नीच्या - अल्पवयीन बहिणीला म्हणजेच सालीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली. सालीला पळवून नेल्यामुळे सासरवाडीतील मंडळी हैराण झाल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात जावई 1)उमेश रमेश निगळ, आणि त्याचे साथीदार 2) रमेश शंकर निगळ दोघे राहणार कापूसवाडगाव ता. वैजापुर जि. औरंगाबाद.3) राजू वाईकर रा. गणेश नगर ता. संगमनेर जि. अहमदनगर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एकाशी झाले होते. लग्नानंतर जावयाचे नेहमी घरी येणे-जाणे असल्यामुळे त्याचे सालीशी गुफ्तगू सुरू असल्याचे दिसून आले. या नखरेल मेहुन्याने 9 मे रोजी धोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला होता. रात्रीच्या सुमारास जावयासह सर्व कुटुंब जेवण आटोपून झोपी गेले. सकाळी सदरील कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. 10 मे रोजी जावयाने मित्राच्या मोबाईलवरून सास-याला फोन करून तुमच्या मुलीला मी रात्री 12 वाजता घेऊन आल्याचे सांगितले की, मी सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असून तिला पुन्हा परत घेऊन येण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राच्या फोन- पे वर दहा हजार रुपये पाठवा.
त्यानंतर सास-याने गावात दुसऱ्याकडून उसने घेऊन साडेसात हजार रुपये जमा केले त्याच्या मित्राच्या फोन पे वर पाठविले. त्यानंतर सास-याने वारंवार जावयाला फोन करून मुलीला घेऊन येण्याची विनंती केली मात्र जावई अजून आलेला नाही.